गहू सुधारित वाण

                         गहू सुधारित वाण
                             गव्हाचे वाण 
 पाण्याचा चांगला निचरा होणारी ,भारी व खोल जमिनीची निवड करावी, मध्यम जमिनीत भरखते व रासायनिक खतांचा वापर केल्यास उत्पादन चांगले घेता येते .  

मशागत :- खरीप हंगामातील पीक निघाल्यावर जमीन लोखंडी नांगराने किंवा ट्रॅक्टर च्या साहाय्याने १५ ते २० सेमी खोलवर नागरावी. त्यानंतर कुळवाच्या ३-४ पाळ्या देऊन जमीन चांगली भुसभुशीत करावी. जमीन ओली करुन पेरणी करावी. 

गव्हाचे वाण : ajit 102 गव्हाचे उत्कृष्ट वाण आहे. 

1) लोक 1
 कालावधी = 100-105 दिवस.
 पिवळा कलर, 30/40 क्विंटल/हेक्टर 

 2) HD-2189
 कालावधी = 110-115 दिवस
 उत्पन्न 35/40 क्विंटल/हेक्टर 
 
3) MACS-3125 
कालावधी 115 दिवसात संपूर्ण
 उत्पन्न 40/45 क्विंटल/हेक्टर

 4) ACS-2496m 
कालावधी 110-125 दिवस 
 उत्पन्न 35/40 क्विंटल/हेक्टर

 5) HI-1418 नवीन चंदोसी 
कालावधी 110-120 दिवस
 उत्पन्न 30/40क्विंटल/हेक्टर
 
6) GW-496 कालावधी 96-113 
दिवस उत्पन्न 40/45क्विंटल/हेक्टर

 7) WH-147 
कालावधी 143 दिवसात संपूर्ण
 उत्पन्न 50/55क्विंटल/हेक्टर

 8) GW-322 
 कालावधी 104/140 
उत्पन्न 46क्विंटल/हेक्टर 

 9) Niaw-301 
कालावधी 109-118 दिवस 
 उत्पन्न 40/हेक्टर 

 निफाड ३४ - हा उशिरा पेरणीसाठी फार चांगला वाण आहे. NIAW-301 ( त्र्यंबक ). 
NIAW - 917 (तपोवन ),  
NACS - 6122 हे सरबत्ती वाण व NIAW - 295 ( गोदावरी ) हा बक्षी वाण बागायती वेळेवर पेरणी करण्यासाठी वापरावा. 
 NIAW - 15 ( पंचवटी )  
AKDW-2997-१६ ( शरद ),
 NIAW-1415 ( नेत्रावती ) 

पेरणीची वेळ :- 
 जिरायती गव्हाची पेरणी ओक्टोम्बरच्या दुसऱ्या पंधरवड्यात करावी. बागायती गव्हाची पेरणी नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात करावी.

बियाणे :-
दर हेक्टरी १०० ते १२५ किलो बियाणे पेरावे उशिरा पेरणीसाठी दार हेक्टरी १२५ ते १५० किलो बियाणे पेरावे. पेरणी पूर्वी बियाण्यास कॅप्टन किंवा थायरम या बुरशी नाशकाची ३ ग्रॅ. प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी तसेच प्रति १० किलो बियाण्यास २५० ग्रॅ ऍझोटोबॅक्टर व २५० ग्रॅ PSB या जिवाणू संवर्धन खताची बीजप्रक्रिया करावी. यामुळे उत्पादनात १० ते १५ % वाढ होते .

पेरणी :- 
 पेरणीच्या वेडी जमिनित पुरेशी ओल असावी . योग्य ओल नसल्यास प्रथम जमीन ओलवावी व वापसा आल्यावर जमीन कुळवावी . बागायत गाव्हची वेळेवर पेरणी दोन ओडीत २० सें मी व उशिरा पेरणी १८ सें मी अंतर ठेऊन करावी . पेरणी उथड म्हणजे ५ ते ६ सें मी . खोल करावी त्यामुळे उगवण चंगली होते . जिरायत गव्हाची पेरणी २ ओळीत ठेऊन करावी. 

खत व्यवस्थापन:- 
 बागायती गव्हाच्या पिकासाठी हेक्टरी २० ते २५ बैलगाड्या चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत द्यावे व व पेरणीसाठी दर हेक्टरी १२० किलो नत्र (युरिया), ६० किलो स्फुरद व ४० किलो पालाश द्यावे. जिरायती गव्हासाठी पेरणीच्या वेळेस हेक्टरी ४० किलो नत्र आणि २० किलो स्फुरद पेरून द्यावे. पाणी व्यवस्थापन - पेरणी नंतर शेत ओलून घ्यावे त्यानंतर साधारण पने दर १८ ते २१ दिवसाच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. मध्यम ते भारी जमिनीत पीक तयार होण्यासाठी ४ ते ५ वेळा पाणी द्यावे लागते

आंतरमशागत :- 
 गव्हात चांदवेल,हरळी ( गवताचे प्रकार ) यासारख्या ताणाचा प्रादुर्भाव होतो. त्याकरिता जरुरी प्रमाणे एक किंवा दोन वेळा खुरपणी, तसेच कोळपणी करून जमीन मोकळी करावी. अंतरमशागतीमुळे ताणाचा नाश होतो व जमिनीत ओलावा टिकून राहण्यास मदत होते. गहू पिकातील अरुंद पानाचे आणि रुंद पानाच्या तण नितंत्रणासाठी पेरणी नंतर ३० ते ३५ दिवसांनी दर हेक्टरी Isoprotyuron (५० %) दोन ते तीन किलो किंवा Metaslfuron Methail (२० %) हेक्टरी २० ग्रॅ. किंवा २, ४-डी ( सोडियम ) अधिक २ % युरिया ६०० ते १२५० ग्रॅ. ६०० ते ८०० लिटर पाण्यातून मिसळून गव्हाच्या दोन ओळीत फवारावे. तणनाशक फवारले नंतर १० ते १२ दिवस पाणी देऊ नये.

पीक संरक्षक :-
गहू या पिकात तांबेरा व उंदीर यांच्यापासून जास्त नुकसान पोहचते. काळा व नारंगी तांबेरा हे दोन्ही महत्वाचे हानिकारक रोग आहे. काळ्या तांबेऱ्यामुळे उत्पादनात २० ते ६० % घट येते. नारंगी तांबेऱ्यामुळे काळ्या तांबेऱ्यापेक्षा नुकसान कमी होते. तांबेरा प्रतिबंधक उपाय म्हणून गव्हाची पेरणी वेळेवर करावी. पिकास पाणी जरुरी पुरतेच द्यावे तांबेरा दिसू लागताच Mancozeb हे बुरशी नाशक १.५ किलो ५०० लिटर पाण्यातून फवारावे जरुरी भासल्यास दुसरी फवारणी पहिल्या फवारणी नंतर १५ दिवसांनी करावी. गव्हावर करपा देखील प्रदूरभाव दिसून येतो. करपा रोगाचे नियंत्रण करण्यासाठी रोगाचे लक्षणे दिसू लागताच copper oxicloride (०.२ %) अधिक Mancozeb (०.२ %) या बुरशीनाशकाच्या मिश्रणाच्या दोन फवारण्या १५ दिवसांच्या अंतराने कराव्यात. मावा या किडीच्या नियंत्रणासाठी Thayomithokzam २५ डब्लूजी ५० ग्रॅ. प्रति हेक्टरी ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. उंदरांचा बंदोबस्त वेळीच करण्यासाठी एक भाग Zing Phosphaid ५० भाग कोणतेही भरड धान्य व थोडे गोडे तेल याचे विषारी अमिश तयार करून प्रत्येक बिळात चमचाभर टाकून बीड बुजवावीत. गहू बियाणे साठवणुकीच्या काळात सोंडे किडीच्या नियंत्रणासाठी, उन्हाळ्यात वाळविलेल्या बियाण्यास प्रति किलो ग्रॅ. या प्रमाणे व्यखंड भुकटी बीजप्रक्रिया करावी. 

कापणी व मळणी :-
पीक तयार होताच वेळेवर कापणी करावी. कंपनीस उशीर झाल्यास एनआय-५४३९ व त्रंबक ( NIAW-३०१ ) या गव्हाच्या वाणाचे दाणे झडू शकतात. म्हणून पीक भरण्याचे २ ते ३ दिवस अगोदर कापणी करावी. कापणीच्या वेळी दाण्यातील ओलाव्याचे प्रमाण १५ % असावेत.

उत्पादन :-
बागायती वेळेवर केल्यास हेक्टरी ४० ते ४५ क्विंटल, बागायती उशिरा लागवड केल्यास ३५ ते ४० क्विंटल. जिरायती लागवड केल्यास १२ ते १४ क्विंटल उत्पादन मिळते.

No comments:

Post a Comment

Thank you for comment