पाऊस पुढील आठ दिवस खंडीत, जुलै 2019



Indiatimepress,

पाऊस आठ दिवस खंडीत  2019, आता पुढील आठ दिवस पाऊस पडण्याची शक्यता नाही. अशी निराशाजनक बातमी शेतकर्यासाठी समोर येत आहे. कारण पुढील काही दिवसांत पाऊसांमध्ये खंड पडण्याची शक्यता दर्शविली जातं आहे. असे हवामान खात्याच्या अंदाजानुसार सांगण्यात येते आहे.


पाऊसात आठ दिवस खंड जुलै 2019

     पाऊस आठ दिवस खंडीत जुलै 2019



कमी दाबाचा पट्टा 

उत्तर भारतात तयार झालेल्या कमी दाबाचा पट्टा, यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात व बाकी काही राज्यात पाऊस पडला होता. जुलै च्या पहिल्या आठवड्यात पाऊस चांगला पडला हे सर्वांना माहीत आहे. मात्र उत्तर भारतातील कमी दाबाचा पट्टा आता विखुरल्या कारणाने पुढील आठ दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता नाही असे हवामान खात्याचे म्हणने आहे. ऐणारा पुढचा आढवडा कोरडा जाण्याची शक्यता आहे.




तुरळक ठिकाणी पाऊस 

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आठवड्यात मध्य महाराष्ट्रात काही तुरळक ठिकाणी तुरळक पाऊस पडेल असे हवामान खाते म्हणाले. इतरत्र काही ठिकाणी अतिशय कमी प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे. चांगल्या स्वरुपात महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता नाही.

शेतकरी चिंताजनक 

पाऊसात आठ दिवस खंड जुलै 2019
Maka 3401



महाराष्ट्रात अनेक ठिकाणी चांगल्या प्रमाणात पाऊस पडला, तरी देखील मराठवाड्यातील अनेक ठिकाणी चांगल्या प्रमाणात पाऊस पडला नाही. मराठवाड्यातील अनेक भागात पाऊसाची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहे. कारण काही ठिकाणी पेरणी जरी झाली असली तरी नदी व धरणे कोरडाच आहे. आजून नद्यांना पाणी गेलेलं नाही. आणि आता तेथील  शेतकरी चिंतेत पडला आहे. कारण शेतात झालेल्या पेरणीला मुसळधार पाऊसाची गरज भासू लागली आहे. कारण शेतातील पिके उन्हाने होरपळून निघत आहे. पाऊसाने तडी दिल्यास मराठवाडा व महाराष्ट्रातील काही भागात पुन्हा एकदा दुष्काळ स्थिती निर्माण होईल. कारण नद्या व धरणे कोरडेठान आहे.

दुबार पेरणी चे संकट 

पाऊस आठ दिवस खंडीत जुलै 2019


पाण्याच्या अशा खंडा मुळे शेतकर्यावर दुबार पेरणीचे संकट येऊ शकते. त्यामुळे शेतकर्याचे पुढचे आठ दिवस चिंतेचे ठरणार आहे. परंतु आठ दिवसानंतर पाऊस सक्रिय होईल असे हवामान खात्याच्या अंदाजानुसार सांगण्यात येते आहे.

मान्सून हा सर्वत्र पसरलेला असुन, मात्र जुलै महिन्यात जास्तीत जास्त खंड पडला आहे. मान्सूनचे मात्र ढग दिसतात, परंतु पाऊस काही येत नाही.

पेरणीचे क्षेत्र 


महाराष्ट्रात जुलै महिन्यात पाऊसात खंड  पडल्याने, शेतकरी आतुरतेने पाऊस वाट पाहत आहे. अखेर शेतात पेरणी 40%  क्षेत्र जमिन  पर्यंत झालेली आहे. या मध्ये कापसाची लागवड संपूर्ण पेरणी पैकी 46% क्षेत्र जमिनीत झाली आहे. तर भाताची लागवड 8% क्षेत्र जमिनीत झाली आहे. कृषि विभागाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात 1 कोटी  49 लक्ष्य  73720 क्षेत्र जमिनी पैकी 35 लक्ष्य 67936 क्षेत्र जमिनीत पेरणी झाली आहे.

खरीपातील तृणधाण्य पेरणी फक्त 12%  क्षेत्र जमिनीत झाली आहे. यात भात 8% व ज्वारी 10% आहे. आणि तुर, उडिद, मुग या गटातील पिकांची पेरणी 20% क्षेत्र जमिनीत झाली आहे.
पाऊसात आठ दिवस खंड 2019,जुलै. 

तेलबिया यामध्ये सोयाबीन, शेंगदाणे यात सोयाबीनची पेरणी 22% क्षेत्र जमिनीत झाली आहे. महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त लागवड कापसाची झाली आहे.


No comments:

Post a Comment

Thank you for comment