मिरची चे पावसाळी नियोजन 2019

मिरची चे पावसाळी नियोजन 2019



 मिरची चे पावसाळी नियोजन 2019, मिरची ची लागवड करताना मिरची विषयी संपूर्ण माहिती असने सर्वात महत्वाचे ठरते. मिरची कोणती लावली, योग्य जातीचा प्रकार माहिती आसावा, उन्हाळ्यात मिरची ची लागवड केल्यास पाणी जास्त प्रमाणात द्यावे लागते. पाण्याची कमतरता असल्याने मिरची ची लागवड पावसाळ्यात करावी.
मिरची ला पावसाळ्यात पाण्याचे नियोजन व्यवस्थित करता येते. पावसाळी मिरची चे नियोजन कसे करावे व मिरची ची जातं निवडतांना कोणत्या बाबी लक्षात घ्याव्या,  हे खालील माहिती प्रमाणे

मिरची चे पावसाळी नियोजन 2019
मिरची चे पावसाळी नियोजन 2019
             

मिरची हे एक उत्कृष्ट पिक 2019

मिरची चे पावसाळी नियोजन 2019 , कृषि क्षेत्रात मिरचीच्या जास्तीत जास्त जाती लागवडी साठी उपलब्ध आहे. प्रत्येक जातीचे वेगवेगळे गुणधर्म आहे. परंतु मिरची ची करण्यासाठी योग्य ती जातं निवडणे योग्य ठरते. कारण जमिनीच्या फरकानुसार व वातावरणा नुसार वेगवेगळे वाण यात प्रकार पडतात. वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या जातीची लागवड केली जाते. शेतकरी आपल्या जमिनीचा प्रकारा ओळखून व माती परिक्षण करून योग्य मिरची ची जातं लागवडीस निवडतात.

मिरची उन्हाळी लागवडीसाठी येथे क्लिक करा......... 


मिरची च्या जातीची योग्य निवड 2019



1) मिरची ची जातं निवडतांना तीचा रंग, आकार, लांबी या गोष्टी लक्षात घेणे योग्य ठरते.

2) मिरची चे बाजारभाव नुसार मिरची ची योग्य निवड करावी.

3) वाळलेल्या मिरची निवड करताना पातळ सालं, कमी बिया, जास्त वजन, मध्यम तिखट व देठ मजबूत असलेली जातं योग्य ठरते.

4) हिरव्या मिरची साठी लांब,चकाकनारी, आकर्षनयुक्त व कमी तिखट असणारी जातं योग्य ठरते.
5) मिरची ही मसाला व मिरची पावडर  बनायला योग्य ती जातं निवडणे योग्य ठरते.

मिरची च्या जातीचे विविध प्रकार

1] तेजस्विनी
2] तेजाफोर
3] राशी
4] अग्निरेखा
5] फुले ज्योती
6] ब्याडगी
7] ज्वाला
8] पंत सी-1
9] फुले सई
10] संकेश्वरी

मिरची च्या जातीची विविध प्रकारानुसार माहिती 


1> तेजस्विनी मिरची  = हि एक तिखट मिरची ची जातं आहे. हि जातं कोणत्याही शेत जमिनीत येते. बाजारात या मिरची ला योग्य भाव मिळतो.
एकरी उत्पन्न- 8 ते 10 क्विंटल प्रती एकर
मर रोग व थ्रिप्स कमी प्रमाणात येते.
जमिनी नुसार खतांचा वापर करावा.

2> तेजाफोर मिरची  = हि जातं काळ्या जमिनीत चांगल्या प्रकारे येते.
तोडा करण्यास उपयुक्त ठरते. बाजारभाव चांगला मिळतो.
एकेरी उत्पन्न 10 ते 12 क्विंटल प्रती एकर
थ्रिप्स व हिरवा तुडतुडा रोखण्यास प्रतिकार करते.

3> राशी मिरची = हि जातं काळ्या व मध्यम स्वरुपाच्या जमिनीत येते. उपयुक्त व मध्यम तिखट, तोडा करण्यास अतिशय सोपी.
एकेरी उत्पन्न 8 ते 10 क्विंटल प्रती एकर
खतांचा वापर करताना सिंचन द्वारे द्यावे. ह्युमिक ऑसिड, 19:19:19 असे खते वापरावी.

4>अग्निरेखा मिरची = हिरवी मिरची तोडण्यास उपयुक्त ठरते.
एकेरी उत्पन्न 8ते 10 क्विंटल प्रती एकर
भुरी आणि मर रोग यांवर प्रतिकार करते.

5>फुले ज्योती मिरची = मसाला पावडर बनवण्यासाठी हि मिरची जास्त वापरली जाते.
वाळेल मिरची चे एकेरी उत्पन्न 10ते 12 क्विंटल प्रती एकर
भुरी रोग कमी प्रमाणात पडतो, फुलं किडे व पांढरी माशीला प्रतिकार करते.

6>ब्याडगी मिरची = लाल मिरची साठी हि जातं वापरली जाते. दीर्घ काळ साठवून ठेवता येते, रंग फिकट होतं नाही. मिरची वर सुरकुट्या जास्त असतात. मिरची ची साल जाड राहते. त्यामुळे वजन जास्त राहते.

7>ज्वाला मिरची = लागवडी साठी योग्यजातं आहे.
तिखटपणा जास्त आहे.

8> पंत सी-1मिरची = हिरव्या व लाल मिरची साठी हि जातं वापरली जाते. तिखटपणा जास्त आहे.

9>फुले सई मिरची = या मिरची ला वाळलेल्या नंतर रंग गर्द लाल होतो. तिखटपणा मध्यम आहे.

10>संकेश्वरी-32 मिरची = या मिरची ची लागवड मुख्यतः लाल मिरची च्या उत्पादनासाठी केले जाते. तिचा रंग लाल व आकर्षक असतो. तिखट मध्यम आहे.
हि जातं प्रामुख्याने कोरडवाहू जमिनीत लावली जाते.

मिरची चे पावसाळी नियोजन 2019
मिरची चे पावसाळी नियोजन 2019




मिरची लागवड प्रक्रिया  

मिरची चे पावसाळी नियोजन 2019 मिरची ची लागवड करताना योग्य मिरची ची जातं प्रथम निवडावी.  त्यानंतर शेतात नांगरनी करुन मशागत करावी. आणि शेतात विशिष्ट अंतरावर सरी पाडून ब्लिचिंग करावी. पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन वापरावे. दोन ओळीतील अंतर 4 फुट  व दोन झाडातील अंतर 2 फुट हे अंतर योग्य ठरते.



 मिरची ची लागवड  बिज प्रक्रिया 

मिरची चे पावसाळी नियोजन 2019
गादी वाफ्यावर पेरणीपूर्वी तीन ग्रॅम थायरम प्रति किलो बियाण्यास चोळावे.

बियाण्याचा दर:

बियाण्याची मात्रा :1.0 किलो ग्रॅम प्रति हेक्टर

गादिवाफ्यावर पेरणी:

दोन ओळींतील अंतर 10 से. मि.ठेववे.  5 से.मि. खोलीवर बियांची पातळ पेरणी करून बारीक मातीने बियाणे झाकावे.

बियाण्याची उगवण होईपर्यंत आच्छादन झाकून सकाळी व सायंकाळी झारीने पाणी द्यावे.
वाफ्यास 25 ते 30 ग्रॅम फोरेट देऊन पाणी द्यावे.

पेरणीनंतर 30 दिवसांनी प्रति वाफ्यास रोपांच्या जोमदार वाढीसाठी 20 ते 25 ग्रॅम युरिया दोन ओळींमधुन पिकांस द्यावे.

रस शोषण करणा-या किडींसा व करपा रोगापासून संरक्षण होण्यासाठी 12 mi.li. नुवाक्रॉन अधिक 25 ग्रॅम डायथेन एम 45 प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून उगवण झाल्यानंतर दर दहा दिवसांच्या अंतराने दोन ते तीन फवारण्या कराव्यात.



5 comments

  1. I am curiоus to find oᥙt what blog system you're using?
    I'm having some minor securіty issսes with my latest siite and I wⲟuld
    like tto find something more safe. Ⅾo yoou have any recommendations?

    ReplyDelete
    Replies
    1. I am use template news flash and best seo frendly template.

      Delete
  2. मिरची रोप तयार पाहिजे

    ReplyDelete

Thank you for comment