मिरची उन्हाळी लागवड 2020

 मिरची उन्हाळी लागवड 2020




मिरची उन्हाळी लागवड 2020, प्रत्येकाला दररोज च्या आहारात मिरची किती महत्वाची आहे. तिखटपणा व स्वाद असल्याने प्रत्येक कुटुंबात स्वयंपाकासाठी मिरची लागते. मिरची हि एक प्रमुख मसाला पिक आहे. शेतकर्याने उन्हाळी मिरची लागवड करायला हवी. कारण बाजारात मिरची ला खूप मागणी असते.  मिरची उन्हाळी लागवड कशी करावी व केव्हा करावी हे सविस्तर सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
मिरची उन्हाळी लागवडीचे फायदे काय हे जाणून घेण्यासाठी
खालील माहिती संपूर्ण वाचून काढायला हवी.
 मिरची उन्हाळी लागवड तंत्रज्ञान व माहिती

मिरची उन्हाळी लागवड 2020
मिरचीउन्हाळी लागवड 2020


1. जमीन निवड व पुर्व मशागत : उन्हाळी मिरची ही मध्यम व भारी काळी जमीन, पाण्याचा निचरा होणारी, सुपीक जमीन अशा जमिनीत करावी. हलक्या व चुनखड जमिनीत शेनखत वापरल्यास मिरची पिक चांगल्या प्रकारे येते. शेताची खोल नांगरनी करुन दोन ते तीन कुळण्याच्या पाळी द्यावी.

2. हवामान व तापमान  : उष्ण समशीतोष्ण , तापमान 20 ते  35 सेल्सिअस.  उन्हाळ्यात तापमान जास्त प्रमाणात असल्याने मिरची ची रोपे उष्णतेने जळतात. त्यामुळे उन्हाळी मिरची ला पाण्याची जास्त गरज भासते. जळलेली रोपे काढून टाकणे व त्या ठिकाणी रात्री 10 ते 11 वाजेपर्यंत नवीन मिरची ची रोपे लावली.

3 . बियाणे निवड : उन्हाळी मिरची साठी संकरित वाण  शिवगंगा, पुसा ज्वाला, सदाबहार, लोहीत, सुफल, फुले ज्योती, मुक्ता, राशी, पंत सी 1, संकरित बि-याणे निवडावेत.



एकरी आर्धा किलो बि-याणे वापरावे.




4. बियाणे बिज पक्रिया : थायरम बियाण्याला चोळावे, थायमेट व गंधक मिक्स चोळावे.



मिरची चे पाऊसाळी नियोजनासाठी येते क्लिक करा.......


5. लागवड पद्धत व लागवड कालावधी : उन्हाळी मिरची लागवड ही मार्च महिन्यात करावी. मिरची हि गादी वाफा किंवा कोकोपीट मध्ये सर्व रोपे तयार करून घ्यावी. रोप पेरणी साठी योग्य झाल्यावर वरांबा पद्धतीने दोन ओळीतील अंतर 4 फुट व दोन झाडातील अंतर 8 ते 10 सेंटीमीटर ठेवावे. ठिंबक सिंचन असल्यास 4/1.5 फुट चे अंतर योग्य ठरते. मिरची लागवडी आधी रोपाचे शेंडे प्रती लिटर पाण्यात क्लोरपायरीफाॅस 36% , + 1.5 ML +1.4 ग्रॅम मॅकोझेब + 30 ग्रॅम पाण्यात गंधकाच्या द्रावणात बुडवून लावावेत. उंच व पसरट वाढणाऱ्या जातींची ६० बाय ६० सेंमी आणि बुटक्‍या जातींची ६० बाय ४५ सेंमी अंतरावर लागवड करावी. कोरडवाहू मिरचीची लागवड ४५ बाय ४५ सेंमी अंतरावर करावी. रोपांची सरी वरंबा पद्धतीने लागवड करावी. मिरची उन्हाळी लागवड 2020

लागवडीपूर्वी रोपांचे शेंडे प्रति लिटर पाण्‍यात क्लोरपायरीफॉस (३६ टक्‍के प्रवाही) १.५ मिलि अधिक १.४ ग्रॅम मॅंकोझेब अधिक ३० ग्रॅम पाण्‍यात विरघळणाऱ्या गंधकाच्या द्रावणात बुडवून लावावेत.

6. खत व्यवस्थापन : सर्व प्रथम मिरची ला शेनखत वापरल्याने पिकाला उष्णते पाऊस वाचवता येते. त्या नंतर 100;50;50 किलो नत्र:स्फुरद : पालाश प्रति हेक्टरी नत्र व पूर्ण पालाश व स्फुरद लागवडीच्या वेळी. बाकी नत्राचा अर्धा हफ्ता लागवडी नंतर 4 ते 6 आठवड्यानी म्हणजेच फूल आणि फळ धारणेच्या वेळी द्यावा. मात्र खतांची मात्रा दिल्यानंतर लगेच पाणी द्यावे अन्यथा त्याचा झाडांवर विपरीत परिणाम होतो. (माती परीक्षण अहवालानुसार खात मात्रा द्यावी.) मिरची उन्हाळी लागवड 2020.

7.आंतरमशागत : आवश्यकतेनुसार खुरपणी करून पिक स्वच्छ ठेवावे. झाडांच्या वाढीच्या पहिल्या 30-45 दिवसांपर्यंत पिक तणापासुन मुक्त ठेवावे. जमिनीलगत हवा खेळती ठेवावी. तसेच फूल धारणेच्या वेळी झाडांच्या खोड़ास मातीची भर द्यावी जेणे करुण झाडे कोलमड़नार नाहीत.




8. पाणी व्यवस्थापन : पाणी गरजेपेक्षा जास्त अथवा कमी पाणी झाल्यास फुलांची गळ होते. जमिनीच्या प्रकारानुसार तसेच पाऊसमाण, तापमान व हंगामानुसार पाण्याच्या पाळया द्याव्यात. पावसाळ्यात गरजे प्रमाणे 15 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. हिवाळ्यात 8 ते 10 दिवसाच्या अंतराने व उन्हाळ्यात 5 ते 6 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. अतिशय महत्त्वाचा टप्पा म्हणजे मिरची ला फुले लागते वेळी पाणी भरपूर द्यावे लागेल. त्यामुळे फूलं व फळ गळती थांबणे शक्य होणार. त्यामुळे पाण्याचा तान पडता कामा नयेत.

जमिनीच्‍या मगदुराप्रमाणे पाणी द्यावे. प्रमाणापेक्षा जास्‍त किंवा कमी पाणी देऊ नये. फूल आणि फळ अवस्थेतील झाडांना पाण्‍याचा ताण द्यावा. उन्‍हाळ्यात ६ ते ८ दिवसांच्‍या अंतराने पिकाला पाणी द्यावे.


No comments:

Post a Comment

Thank you for comment