स्मार्ट फोन शाओमी कंपनी

शाओमी आज लाँच करणार स्पेशल फोन,'जगावेगळा’ स्मार्टफोन असल्याचा कंपनीचा दावा.


शाओमी इंडियाचे मॅनेजिंग एडिटर मनू जैन यांनी हा OUT OF THE WORLD अर्थात जगावेगळा फोन असेल, श्वास रोखून धरा असं म्हटलंय



स्मार्ट फोन शाओमी कंपनी
स्मार्ट फोन शाओमी कंपनी


पुरे विश्व में सबसे बड़ी और भारत देश के मार्केट में चलने वाले फोन, शाओमी चीन कीं बडी कंपनियां हैं। 


स्वस्तात मस्त स्मार्टफोन बनविण्यासाठी ओळखली जाणारी शाओमी कंपनी आज तब्बल 4.8 लाख रुपये किंमतीचा एक स्पेशल स्मार्टफोन लाँच करणार आहे. नेहमी परवडणाऱ्या किंमतीचे स्मार्टफोन बनविणारी शाओमी इतका महागडा स्मार्टफोन लाँच करत असल्यामुळे या फोनबाबत सोशल मीडियावर अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. त्यातच शाओमी इंडियाचे मॅनेजिंग एडिटर मनू जैन यांनी ट्विटरद्वारे हा OUT OF THE WORLD अर्थात जगावेगळा फोन असेल, श्वास रोखून धरा असं ट्विट केल्यामुळे अधिक चर्चा आहे.


भारता मध्ये शाओमी कंपनी चे सर्वाधिक लोकप्रिय फोन 


शाओमी कंपनी आज भारतात के सीरिजमधील पहिले दोन स्मार्टफोन रेडमी के20 आणि रेडमी के20 प्रो लाँच करणार आहे. या दोन्ही फोनसोबत कंपनी एक स्पेशल व्हेरिअंट असलेला स्मार्टफोन देखील लाँच करणार आहे. शाओमी इंडियाचे मॅनेजिंग एडिटर मनू जैन यांनी याबाबत ट्विटरद्वारे माहिती दिलीये. मनू जैन यांनी ट्विटरवर केलेल्या पोस्टमध्ये एक फोटोही पोस्ट केला आहे. त्या फोटोमध्ये आकर्षक गोल्ड फिनिशचा आणि मागील बाजूला K लोगो असलेला एक फोन दिसत आहे. मागील बाजूला K लोगो असल्याने हा स्पेशल व्हेरिअंट असलेला रेडमी के20 प्रो फोन असण्याची चर्चा आहे. हा स्मार्टफोन जगावेगळा असेल असं ट्विट मनू जैन यांनी केलं आहे. तसंच या फोनची किंमत 4.8 लाख रुपये असेल असंही त्यांनी स्पष्ट केलं. मात्र हा फोन नेमका कसा असणार, यात काय फीचर्स आहेत याबाबत सस्पेंस कंपनीने कायम ठेवला आहे

No comments:

Post a Comment

Thank you for comment